बीड
बीड विभागातील सर्व ताज्या घडामोडी
पालकमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वात बीड–पुणे रेल्वेचा शुभारंभ; मराठवाडा मुक्ती दिनी बीडकरांना मोठी भेट
बीडच्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. बीड–पुणे रेल्वे सेवा १७ सप्टेंबरपासून सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधत या महत्त्वाच्या रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्याचे नियोजन आहे. पालकमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्पासह बीड–पुणे आणि बीड–मुंबई रेल्वे सेवांबाबत नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत बीड–पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे १७ सप्टेंबरला बीडकरांना पुण्याशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बीड जिल्ह्यासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. मागील अनेक वर्षांपासून बीडकर रेल्वेची प्रतीक्षा करत होते. १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड–अहिल्यानगर...
सविस्तर वाचा
‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचे आश्वासन
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भविष्याला नवी दिशा; संत भगवानबाबा वसतिगृहाची पाहणी, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांचा शिक्षणातून सक्षम पिढी घडवण्याचा निर्धार!
"३५ वर्षांची प्रतीक्षा संपली! टाकळगाव (हिंगणी) बॅरेजचे भूमिपूजन; स्व. अजितदादांचा जलसंकल्प उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनींकडून साकार"
बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवारांचा जनतेशी थेट संवाद; विकासकामांसह नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य
विकासाचा धडाका! बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा
एलपीजी संकट अखेर टळलं! व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्ववत; हॉटेल, केटरिंग आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा
अवकाळी संकटात शेतकऱ्यांच्या बांधावर सुनेत्राताई; बारामतीतील नुकसानग्रस्तांना दिला दिलासा